Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाधोनी बॅटिंगला आल्यावर अनुष्का म्हणाली ते 3 शब्द.. तुम्ही ऐकलेत का ?

धोनी बॅटिंगला आल्यावर अनुष्का म्हणाली ते 3 शब्द.. तुम्ही ऐकलेत का ?

17 एप्रिलच्या संध्याकाळी, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ बंगळुरूच्या मैदानावर समोरासमोर आला, तेव्हा त्या सामन्याचे वर्णन आयपीएल 2023 मधील सर्वात मोठा सामना म्हणून करण्यात आले. हा सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये होती. मॅचदरम्यान विराट कोहली खेळत असताना अनुष्का भावना व्यक्त करत होती. पण, जेव्हा एमएस धोनी खेळायला आला, तेव्हाही तिचा उत्साह कमी झालेला दिसत नव्हता.

एमएस धोनी फलंदाजीला आला तेव्हा बंगळुरूचे संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धोनीच्या नावाचा गजर होता. सर्व प्रेक्षक धोनीच्याच नावाने घोषणा देत होते. मोबाईलचा लाइट लावून सर्वजण धोनीवरचे प्रेम व्यक्त करत होते, ते पाहून अनुष्का शर्माही चकित झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी अनुष्का शर्माच्या तोंडून फक्त 3 शब्द बाहेर पडले होते, ‘They Loved Him’. अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. म्हणजेच सर्वजण त्याच्यावर (धोनी) किती प्रेम करतात.

पती विराट कोहलीविरुद्धच्या सामन्यात आपल्याच संघाच्या घरच्या मैदानावर एमएस धोनीवर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम पाहून अनुष्का शर्मालाही आनंद झाला. ती हसताना दिसली.

मात्र, धोनी फलंदाजीला आल्यानंतर दिसलेला अनुष्का शर्माचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण सीएसकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात दिसणारे अनुष्काचे हास्य क्षणात बदलले. कारण आरसीबीच्या डावाच्या पहिल्याच षटकात जेव्हा विराट कोहली चौथ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला तेव्हा ती निराश झाली.

आयपीएल च्या 16 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने हायस्कोअरिंग मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 8 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आरसीबीसमोर विजयासाठी 227 धावांचे डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे सामन्यात रंगत आली होती. मात्र ग्लेन आणि फाफ दोघेही आऊट झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मॅचविनिंग खेळी साकारण्यात अपयश आलं. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 218 धावाच करता आल्या.

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने 83 धावांची खेळी केली. शिवम दुबे याने 27 चेंडूत 52 धावांचं वेगवान अर्धशतक इनिंग साकारली. अजिंक्य रहाणे याने 37 रन्स केल्या. मोईन अली याने नाबाद 19 धावा केल्या. अंबाती रायुडूने 14 आणि रविंद्र जडेजाने 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड या सामन्यात अपयशी ठरला. गायकवाड 3 रन्स करुन तंबूत परतला. तर धोनी 1 धावेवर नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार वैशाख, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल या सर्वांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -