सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची (यल्लम्मा) मुख्य यात्रा २३ डिसेंबरला होणार आहे. या यात्रेला दरवर्षी कोल्हापूर शहर व उपनगर परिसरातून जवळपास लाख ते सव्वा लाख भाविक जात असतात.
मात्र, त्यांना एसटी महामंडळाकडून तसेच बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत भाविक व्यक्त करत आहेत. यात्रेसाठी काेल्हापूर शहर व उपनगरांतून प्रासंगिक कराराद्वारे यात्रेपूर्वी ८ दिवस अगाेदर एस.टी. गाड्यांचे आरक्षण केले जाते. येथून आरक्षित एसटी, खासगी बसेस मुख्य यात्रेच्या तीन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजता रवाना हाेतात. कागल डेपाे येथे गेल्यावर गाड्यांची तपासणी केली जाते. येथे कर्मचारी वर्ग कमी असल्याने तपासणीस विलंब हाेताे. साैंदत्तीत प्रवेशद्वाराजवळच एसटी गाड्या अडविल्या जातात. तेथून १ कि.मी. अंतर चालत जाण्यास सांगितले जाते. एसटी मंदिरापर्यंत जाण्यासाठी ५०० रुपये घेतले जातात. मंदिरामागे असलेल्या याेनीकुंड येथे पाेलिस बंदाेबस्त नसल्याने चाेरीचे प्रकार घडतात. तसेच शाॅवर, शाैचालयांचीही येथे पुरेशी व्यवस्था नाही. याबाबत बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेकडून सांगण्यात आले.एसटी, खासगीच्या ५०० गाड्या होतात रवाना सौंदत्ती यात्रेसाठी शहर व परिसरातून एसटीच्या २५० व खासगी २५० गाड्या रवाना हाेतात. प्रामुख्याने यात्रेसाठी शिवाजी पेठ, रविवार पेठ, मंगळवारपेठ, बुधवार पेठ येथील भाविकांची संख्या जास्त असते. तसेच कसबा बावडा, रेणुकानगर, जवाहरनगर, फुलेवाडी, देवकर पाणंद व उपनगरांतूनही भाविक माेठ्या संख्येने यात्रेला जातात.
एसटी प्रशासनाकडे केल्या या मागण्या
५६ सीटर, ४३ सीटरचे दरपत्रक जाहीर करा
राेजची ३०० किलाेमीटरप्रमाणे दर आकारणी न करता ३७० किलाेमीटरने करावी. खाेळंबा दर २०० रुपये आहे ताे नाममात्र करावा.
दरमाणसी १६०० रुपये येतो खर्च या यात्रेसाठी प्रतिमाणसी एसटी गाडी प्रवासाचा खर्च ८५०, जेवणासह १६०० रुपये तीन-चार दिवसांचा खर्च येताे. यावर्षी एसटीने दर वाढविल्याने प्रतिमाणसी प्रवास खर्च ९५० रुपये इतका येणार आहे.
साैंदत्ती यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या एसटी गाड्या सुस्थितीत असाव्यात. गेल्यावर्षी ६४ रुपये प्रति कि.मी. असा दर हाेता. आता ७५ रुपये प्रति किलाेमीटर केला आहे. त्यामुळे पॅकेजमध्ये ४००० ते ५००० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा.
