Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात – राऊत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप असताना आता नवनवीन दावे करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटात असंतोष आहे. लवकरच याचा स्फोट होईल, असे म्हटले आहे. त्याचवेळी आता ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेले मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करताना गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुद्धा झालेली नाही.निश्चित फॉर्म्युला तयार झालेला नाही. आत्ता खासदारकीच्या जागा आमच्याकडे जास्त आहेत. त्यामुळे आमच्या जागा कायम ठेवून शिल्लक जागा समान ठेवायच्या असा फॉर्म्युला झाल्यास तोडगा निघू शकतो. जागांची अदलाबदली देखील होऊ शकते. कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत केलेल्या तक्रारी फक्त बदनामीसाठी आहेत. 50 खोके आणि शंभर कोटीची विकास कामे, अशी आमिषे दाखवून शिवसेनेतील नेत्यांना जवळ घेतले. खोक्यांच्या बाबतीत टोकन असलं तरी विकास कामांच्या बाबतीत जवळ घेतलं नाही, हा असंतोष शिंदे गटाच्या आमदारात आहे. तो लवकरच उफाळून येईल. ज्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं त्यांचे पितळ उघडे पडणार आहे, असा दावा यावेळी विनायक राऊत यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -