Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगगौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज!Gautami Patil

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज!Gautami Patil


नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काही ना काहीतरी गोंधळ होत असतो. गौतमीच्या नावावर हजारो लोकं कार्यक्रमाला येतात. या लोकांना सांभाळणे पोलिसांच्या नाकीनऊ येते. काही युवक कार्यक्रमात हुल्लडबाजी करतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमात राडा हे जणू समीकरण झालंय. अशीच एक घटना जुन्नर तालुक्यात घडली. कार्यक्रमात हुल्लडबाजी  केली, म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पण, आम्हच्या जागेत कार्यक्रम होता. आम्हाला न विचारता मारहाण का केली, असा आरोप युवकांनी केला. यामुळे कार्यक्रमातील नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.Gautami Patil

आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रत्येकवेळी काही ना काही राडा होत असतो. जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या गौतमी पाटील हिच्या डिजे शो कार्यक्रमात अनेकवेळा काही युवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

मात्र येथील खुडे कुटुंबातील नयन खुडे आणि त्यांचा भाऊ तसेच त्यांच्या आईवर पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप खुद्द नयन खुडे आणि त्याच्या भावाने आणि आईने केला आहे.

ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे ती जागा आमच्या मालकीची आहे. आम्हाला साधं विचारलं देखील नाही. या कारणावरून त्यांनी हातात ज्वलनशील द्रवरूप इंधन बाटलीमध्ये घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून पोलिसांनी त्यांना मार दिला असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला.Gautami Patil


कार्यक्रमातील लोकांना सांभाळणे खूप कठीण असते. अशावेळी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागतो. कधीकधी गैरसमजातूनही असे प्रकार होतात. पोलीस म्हणतात, युवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला. पण, युवकांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला विचारपूस करता का मारहाण केली, असं युवकांचं म्हणण आहे.Gautami Patil

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -