ताजी बातमी ऑनलाईन टीम
एक काळ मोठा पडदा गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आज झगमगत्या विश्वापासून फार दूर स्वतःचं आनंदी आयुष्य जगत आहेत. पण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अर्चना जोगळेकर यांना देखील अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि झगमगत्या विश्वाला रामराम ठोकला. आज अर्चना जोगळेकर मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी त्यांची चर्चा कामय चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अर्चना जोगळेकर यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना म्हणून देखील आहे.
एक काळ टीव्ही आणि सिनेमांमध्ये वर्चस्व असणाऱ्या अर्चना जोगळेकर यांच्यासोबत असं काही झालं, ज्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीसोबतच देश देखील सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अर्चना जोगळेकर यांच्यासोबत असं काय झालं होतं ज्यामुळे त्यांनी टोकाचा पाऊल उचलला.. याबद्दल जाणून घेवू. अर्चना जोगळेकर हे नाव फक्त सिनेमांमध्येच नाही तर, टीव्ही विश्वात देखील फार मोठं होतं.
अर्चना जोगळेकर यांनी ‘किस्सा शांती का’, ‘कर्णभूमी’ आणि ‘फूलवती’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सिनेमांमध्ये देखील अर्चना जोगळेकर यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. पण उडिया भाषेतील एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यासोबत एक असा धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली होती..
मराठमोळ्या अभिनेत्रीवर ‘या’ व्यक्तीने केलेला बलात्काराचा प्रयत्न; धक्कादायक प्रसंगानंतर घेतला मोठा निर्णय
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -