ताजी बातमी ऑनलाईन टीम
‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये जी गोष्ट घडणार असा प्रेक्षकांना अंदाज होता, अखेर तेच घडलं. या आठवड्यात शोमध्ये जद हदिद आणि आकांक्षा पुरी यांच्या किसची जोरदार चर्चा झाली. एका टास्कदरम्यान दोघं 30 सेकंदांपर्यंत लिप-टू-लिप किस करत होते. या घटनेवर आता सूत्रसंचालक सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस ओटीटीचा कंटेंट हा कौटुंबिक असण्यावर अधिक भर असेल, असं सलमानने शो सुरू होण्याआधी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र टीव्हीप्रमाणे ओटीटीला कोणताच सेन्सॉरशिप नसतो, या गोष्टीचा फायदा पुरेपूर या शोने घेतला. हीच गोष्ट सलमानला आवडली नाही. सोशल मीडियावर या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये भडकलेला सलमान थेट शो सोडण्याबद्दल बोलताना दिसतोय.
‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ‘वीकेंड का वार’ या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सलमान स्पर्धकांवर खूप नाराज असल्याचं दिसून येत आहे. तो म्हणतो, “तुम्हाला असं वाटतंय की हा या आठवड्यातला हायलाइट होता. संगोपन, कुटुंब, नैतिकता, तो टास्क तुमच्या सभ्यतेविषयी होता का? तुम्ही जे केलंत त्यासाठी माझी माफी मागण्याची गरज नाही. मला काहीच फरक पडत नाही. मी इथून निघून जातोय. मी हा शो सोडतोय.”
स्पर्धकांना बसला धक्का
यानंतर सलमान स्टेजवरून जाताना दिसतो. तो खरंच शो सोडतोय का असा प्रश्न स्पर्धकांना पडतो. त्याविषयीचा खुलासा आता वीकेंड का वार या खास एपिसोडमध्येच होईल. या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मला माहीत होतं की भाईजान रागावेल. जो माणूस त्याच्या चित्रपटात किसिंग सीन ठेवत नाही, हा तर फक्त रिॲलिटी शो आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘ड्रामा सुरू आहे. आकांक्षाला बाहेर काढा, तसंही ती काहीच करू शकत नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
Bigg Boss OTT 2 | “मी हा शो सोडून जातोय”; बिग बॉसच्या घरातील किसिंगवर भडकला सलमान खान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -