Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंग'चांद्रयान-3' मधील प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे; मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण!

‘चांद्रयान-3’ मधील प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे; मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण!

चांद्रयान-3 मोहिमेतील एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार पाडण्यात इस्रोला यश मिळालं आहे. चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल आणि विक्रम लँडर हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. आता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करेल, तर प्रॉपल्शन मॉडेल चंद्राच्या भोवती फिरत राहणार आहे.

इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विक्रम लँडरच्या आतमध्येच प्रज्ञान रोव्हर आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर बाहेर येईल, आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन माहिती गोळा करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -