Wednesday, February 25, 2026
Homeमहाराष्ट्र10 वीची परीक्षा देताना विद्यार्थीनी बनली आई, गणिताचा पेपर अर्ध्यात सोडून वॉशरुममध्ये...

10 वीची परीक्षा देताना विद्यार्थीनी बनली आई, गणिताचा पेपर अर्ध्यात सोडून वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

महाराष्ट्रासह देशभरात दहावी बोर्डाची परीक्षा आहे. दहावीची परीक्षा (mother) हा करियरचा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांसह पालकांचीदेखील ही परीक्षा असते. दहावीच्या परीक्षेदरम्यान एक विचित्र प्रकार समोर आलाय. दहावीचा पेपर देत असताना विद्यार्थीनीला प्रसूतीकळा येऊ लागल्या. पुढे जे घडलं त्याच्या चर्चा आता देशभरात सुरु आहेत. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील पिथमपुर येथे दहावी बोर्ड परीक्षेदरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या वॉशरूममध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. 25 फेब्रुवारी 2026 रोजी ही घटना समोर आली. 17 वर्षीय मुलगी दहावीत शिकत होती आणि ती बोर्ड परीक्षेला बसली होती. कुटुंबाला तिच्या गर्भारपणाची माहिती नव्हती. ही घटना पिथमपुरमधील हाउसिंग बोर्ड कॉलनीतील एका खासगी शाळेत घडली. ती शाळा परीक्षा केंद्र म्हणून काम करत होती.

 

मुलगी गणिताच्या पेपरला बसली होती. अचानक तिने वॉशरूमला जाण्याची परवानगी (mother)मागितली आणि ती बाहेर गेली. 15 मिनिटे झाली तरी ती परत आली नाही. परीक्षा पर्यवेक्षकांना संशय आला. एका महिला कर्मचाऱ्याला तपासण्यासाठी पाठवले. वॉशरूमचे दार आतून बंद होते. आतून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. कर्मचाऱ्यांनी लगेच शाळा प्रशासनाला सांगितले. शाळेने तातडीने पोलिसांना आणि 108 रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिकेने मुलगी आणि नवजात बाळाला पिथमपुर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी तपासून दोघेही पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले. बाळाला जन्म देण्यात काही अडचण आली नाही. मुलगी बेतमा पोलिस स्टेशन क्षेत्रातील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबाला गर्भारपणाची कल्पना नव्हती. ही घटना सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली.

 

सेक्टर-1 पोलिस स्टेशनमध्ये प्रकरण दाखल झाले आहे. सब-इन्स्पेक्टर चंदनी (mother) सिंगार यांच्याकडे तपास सुरू असून मुलीच्या जबाबानुसार एफआयआर नोंदवण्यात आली आहे. मुलगी 2 वर्षांपासून कन्हा बुरमन नावाच्या तरुणाशी संबंध ठेवून होती. एक वर्षापासून शारीरिक संबंध होते, त्यामुळे गर्भ राहिला. पोलिस कन्हा बुरमनचा शोध घेत आहेत. तो अद्याप पकडला गेला नाही. शाळा परीक्षा केंद्रप्रमुख नरेंद्र कुमार पोथे यांनी सांगितले की, मुलगी अचानक वॉशरूमला गेली आणि परत आली नाही म्हणून कर्मचाऱ्याला पाठवले. आत बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने सर्वांना धक्का बसला. पोलिस तपास सुरू असून शाळा प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे. ही घटना परीक्षेच्या वातावरणात घडल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाशी बोलून अधिक माहिती घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -