धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा बाबतचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, धाराशिव जिल्ह्यासाठी 352 कोटी रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिक विमा 2022 चे वितरण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळलेली होती,
काही शेतकऱ्यांना कमी पिक विमा तर काहींना जास्त अशा प्रकारची ही तफावत असल्यामुळे, शेतकऱ्यांनी जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर कंप्लेंट केलेली असताना शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला होता, तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केलेले नव्हते त्यामुळे, राज्यस्तरीय तक्रार समिती कडे तक्रार करण्यात आलेली होती व या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे.
दहा ऑगस्ट रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये विनयकुमार अवधे यांनी महत्त्वपूर्ण माहिती मांडलेली आहे, त्यामध्ये खरीप हंगाम 2022-23 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील, 6 लाख 72 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आलेले होते. काढणी पश्यात नुकसानी अंतर्गत 5 लाख 89 हजार सूचना प्राप्त झालेल्या होत्या व त्यापैकी 4 लाख 48 हजार सूचनांसाठी 318.73 कोटी रुपयांचा दावा देण्यात आलेला होता.
पिक विमा कंपनी अंतर्गत 5 लाख 22 हजार अर्जासाठी 352 कोटी 85 लाख असा निर्णय घेण्यात आलेला होता व त्यापैकी 4 लाख 67 हजार अर्जदारांना 349 कोटो 88 लाख रुपयाचे वाटप करण्यात आलेले होते. पिक विमा कंपनी अंतर्गत पन्नास पन्नासचे भरांकन करन्यात आलेले होते, परंतु हे भरांकन चुकीचे असल्याची माहिती जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून, व विभाग स्तरीय समितीच्या माध्यमातून सुद्धा भरांकन चुकीचे असल्याची माहिती देण्यात आलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप करण्यात यावे,अशा प्रकारे सांगण्यात आलेले होते.
अनिल जगताप याचिका करते यांच्या माध्यमातून पिक विमा कंपनी संदर्भात असलेल्या चुका निदर्शनास आणून शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेल्या विभाग स्तरीय समितीच्या निर्णयानुसार,शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा आम्हाला कोर्टात जावे लागेल अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली.
तसेच सर्वांचे मुद्दे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची वाटप करण्यात यावे असा शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आलेला आहे.राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती अंतर्गत विम्याचे वाटप करण्यात यावे, अश्या प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे, या कारणांने यापूर्वी देण्यात आलेल्या 352 कोटी रुपयांच्या पुढे अजून 352 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करावा लागणार आहे.