इचलकरंजी शहरातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असून सुमारे सात ते आठ जण अजित पवार गटामध्ये सामील होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याबाबत इचलकरंजी शहरांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असून त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा आहे.
इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी पक्षातील मदन कारंडे व अशोक जांभळे हे दोन्ही गट शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. तर याआधीच शहरातील काही पदाधिकारी अजित पवार गटामध्ये सामील झाले होते. आज माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे हे अजित पवार गटामध्ये सात ते आठ जणांना घेऊन सामील होणार आहेत. चोपडे यांना जिल्हाध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता असून शहराला जिल्हाध्यक्ष पद राष्ट्रवादी अजित पवार गटातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेनंतर ही आणखी काही आजी – माजी नगरसेवक अजित पवार गटामध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
इचलकरंजीत शरद पवार गटाला खिंडार; विठ्ठल चोपडे अजित पवार गटाच्या वाटेवर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -