पेट्रोल डिझेल (Petrol Diesel) सह खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्ये आता गृहिणींना सुखावणारी बातमी समोर येत आहे. येत्या सणांच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही. या वर्षी पाऊस अद्याप सरासरी देखील न पडल्यामुळे याचा परिणाम सोयाबीन सारख्या खरीप पिकांवर झाला आहे. असे असले तरी देखील या वेळेस ऐन सणांना तेलाच्या दरामध्ये (Edible Oil Prices in Festival Season) कोणतीही वाढ होताना दिसणार नसल्याचे फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असल्या तरी देखील खाद्य तेल हे सध्या तरी आहे त्याच दरामध्ये मिळणार आहे. गणपती (Ganapati 2023) व दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर हमखास खाद्य तेलाच्या दरात वाढत होते. घराघरामध्ये या काळामध्ये बनवण्यात येणाऱ्या फराळ व पदार्थांमुळे तेलाची मागणी देखील वाढते. सध्या देशामध्ये महागाई असल्याने अनेकांच्या खिशाला कात्री बसली आहे. यामध्ये आता खाद्य तेलाच्या किंमती न वाढल्यामुळे काहीसा दिलासा गृहिणींना मिळाला आहे. मात्र,सणासुदीच्या काळानंतर खाद्यतेलाचे दर या वर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी एप्रिल-मार्चपर्यंत वाढू शकतात. त्याचा परिणाम तेल उत्पादक देशांमध्ये दिसून येईल, जेथे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता (B.V. Mehta) यांनी देशातील तेलबियांचे उत्पादन व त्यांच्या किमती याबद्दल अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘एफएमसीजी कंपन्या कमी पावसामुळे भात उत्पादनाबाबत चिंतेत आहेत, कारण देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये नॉन-बासमती तांदूळ पिकासाठी चांगला पाऊस झालेला नाही तसेच, सोयाबीन आणि भुईमूग पिकांसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी देखील गेल्या दहा दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे.’
अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक अंगशु मलिक (Angshu Malik) म्हणाले की,
‘भारताने खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर आयात केले आहे, त्यामुळे त्याच्या किमती वाढणार नाहीत.
परंतु अपुऱ्या मान्सूनमुळे सोयाबीन पिकावर परिणामहोईल, अशा स्थितीतही सध्या भाव स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.’
कमी पावसाचा एकूण परिणाम हा आता सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढत आहे.
मात्र खाद्य तेलाच्या दरात आत्ताच वाढ (Edible Oil Prices in Festival Season) होणार नसल्याने सर्वांना
दिलासा मिळाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Government) एलपीजी गॅस सिलेंडरच्या
किमती (LPG Gas Cylinder Prices) देखील कमी केल्यामुळे हा वर्षी सणवारावर तरी महागाईचा सावट पसरणार नाही
असे चित्र सध्या दिसत आहे.
सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -