Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगराज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा! 'या' भागात पावसाचा...

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी (Farmers) चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळं उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -