Homeमहाराष्ट्रपुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात! भावाला भेटायला जाणाऱ्या विवाहित बहिणीचा कंटेनरच्या धडकेत जागीच...

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात! भावाला भेटायला जाणाऱ्या विवाहित बहिणीचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू; पतीसोबत जात होत्या कोल्हापूरला…

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या तेजश्री कृष्णा यादव (वय २७, श्रीपालवाडी, ता. चंदगड) यांचा मृत्यू (Kaneriwadi container truck accident) झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

तेजश्री पतीसोबत दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होत्या. कणेरीवाडीच्या हद्दीत महामार्गावर पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात नेले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

तेजश्री कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे काम करणारे त्यांचे भाऊ विश्वास मारुती कोरे यांना भेटण्यासाठी पतीसोबत जात होत्या. त्यांच्या मागे पती, एक लहान मुलगी, सासू आणि सासरे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -