कृष्णा नदीत (Krishna River) पाच जण बुडाले आहेत. हे पाचही जण परप्रांतीय कामगार आहेत. सांगली जिल्ह्यात ते घरांची फरशी बसविण्याचे काम करतात. मिरज-मालगाव रस्त्यावर असलेल्या दत्तनगर परिसरात हे सर्व कामगार भाड्याच्या घरात राहात असत.कपडे धुण्याच्या निमित्ताने ते नदीमध्ये उतरले होते. या वेळी या पाच जणांपैकी तिघाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाचही जणांचा शोध पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचे. तोपर्यंत ओम पाटील नावाच्या तरुणाने पाण्यात बुडत असलेल्या तिघांना वाचवीले होते. उर्वरीत तिघांना मात्र वाचवता आले नाही. या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरीत दोघांचा शोध घेतला जात आहे. प्राप्त माहितीनुसार रामस्वरूप यादव (वय 23) आणि जितेंद्र यादव (वय 21) अशी बेपत्ता दोघांची नावे आहेत. त्यापैकी रामस्वरूप यादव याचा मृतदेह हाती लागला आहे.
कृष्णा नदीला पाणी असते तेव्हा नवख्या माणसाला त्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यात पीडित तरुण हे परप्रांतीय असल्याने त्यांना स्थानिक भौगोलिकतेचा पुरेसा अंदाज नसावा. त्यामुळे ते धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरले असावेत, असा कयास बांधला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठीपाठवला आहे. अधिक तपास सुरु आहे.