आजकाल AI ची मोठी चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळते. प्रत्येक मोठी कंपनी सध्या AI चा वापर करताना दिसत आहे. AI ची लोकप्रियता देखील जगात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. AI ने भारतीय लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोणतेही काम सहजतेने करण्यासाठी बरेच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करतात. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. प्रत्येक अॅपची कंपनी त्यांच्या अॅपमध्ये नवनवीन अपडेट देत असतात. तसेच इंस्टाग्रामवर लवकरच AI Tool आणणार आहे. इंस्टाग्राम एआय चॅटबॉटवर काम करत आहे. जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असेल. स्नॅपचॅटने काही काळांपूर्वी एआय चॅटबॉट फिचर लागू केले होते. हे चॅटबाॅट मेसेज टाईप करण्यात अडचण येते त्यांच्याकरता हे फिचर उपयोगी पडणार आहे. सोबतच हे फिचर तुम्हाला प्रत्येक विषयावर सल्ला हवा असेल तर तुम्ही चॅटबाॅटची मदत घेऊ शकता. हे फिचर इंस्टाग्रामवर कधी सुरू होणार याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन आणण्यावर काम करत आहे. हे काम आता पूर्ण झाले असून तु्म्ही आता वेबच्या मदतीने मेटाने थ्रेड्स ओपन करू शकता. याचाच अर्थ थ्रेड्स वापरण्याकरता वेब व्हर्जन सुरू झाले आहे. या वेब व्हर्जनमुळे यूजर्स थेट पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील. थ्रेड्स हे Instagram चे एक नवीन अॅप आहे जे यूजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर यूजर्सच्या मेसेजला रिप्लाय देऊन संभाषण सुरु करू शकतो.
थ्रेड्सचं (Threads) चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल.
कशा प्रकारे लाॅगिन करावे
– सर्वात पहिले Google वर जा आणि http://www.threads.net असे टाका.
– त्यानंतर तुमचे Instagram चे डिटेल्स त्यात भरा. जसे की, यूजरनेम आणि पासवर्ड
– असे केल्यावर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येईल तो भरा. असे सगळे केल्यास तुमचे थ्रेड्स खाते उघडले जाईल.