गेल्या ९ दिवसापासून सर्वांच्याच मनावर अधिराज्य केलेल्या गणरायाला विघ्नहर्त्याला आज गुरूवार ता. २८ रोजी निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी वस्त्रनगरी सज्ज झाली आहे. विसर्जन मिरवणूकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा तसेच महानगरपालिका, महावितरण सज्ज आहे.
शहरातील बहुतांशी मंडळांनी भव्यदिव्य आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळण्याची शक्यता आहे. विद्येची देवता श्री गणरायाचे मंगळवार ता. १९ रोजी उत्साहाच्या वातावरणामध्ये विविध सार्वजनिक मंडळांचे देखावे आगमन झाले होते.
शनिवार ता. २३ रोजी घरगुती गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर गेले तीन ते चार दिवस रात्री उशिरापर्यंत शहरातील प्रमुख मार्गासह इतर भाग गर्दीने फुलून गेले होते. शहर परिसरातील काही मंडळ वगळता बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळाने भव्य-दिव्य गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.गणेशोत्सव व ‘श्रीं’ची मूर्ती पाहण्यासाठी यंदा मोठी गर्दी दिसून आली. गणेश विसर्जनावेळी कोणताही अडथळा
होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने युध्द पातळीवर विसर्जन मार्गावरील तसेच अन्य ठिकाणच्या विद्युत तारा उंचीवर नेण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे, मुरूम व डांबरीकरण करून पंचवर्क करण्यात आले आहेत. उद्या गुरूवार ता. २८ रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी इचलकरंजी सज्ज झाली आहे.
विसर्जन मिरवणूकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक अप्पर पोलिस अधिक्षक, दोन पोलिस उपअधिक्षक, चार पोलिस निरीक्षक, २८ सपोनी/पोसई, ३०५ पोलिस कर्मचारी, ३१९ होमगार्ड, १ स्ट्रायकिंग फोर्स, एक आरसीपी प्लाटून, एक एसआरपीएफ प्लाटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणूकीमध्ये विविध राजकीय सामाजिक संघटनेच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाकडूनह विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ पोलिस फौजफाटा, सीसीटीव्ही. वॉच टॉवर, विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. त कोणत्याही प्रकारचा अडथळ निर्माण होऊ नये यासाठी विसर्जन नवव्या दिवशी अनेक मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले.
त्यामुळे दिवसभर विसर्जन मिरवणूक मार्गावर गर्दी दिसून आली. अनेक मंडळांनी बँजो, झांजपथक तसेच इतर पारंपारिक वाद्यांचा समावेश केला होता तर काही मंडळांनी स्टेरिओ बॉक्स लावून श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मार्गाला जोडणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. यंदा दिवसाचा गणेशोत्सव आल असल्यामुळे विसर्जनाच्या आदल्य दिवशी म्हणून बुधवारी नवव्य दिवशी अनेक मंडळां लाडक्या बाप्पाचेविसर्जन केले.