सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिलीय. सरकारनं शुक्रवार २९ सप्टेंबरला सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद गुरुवारी २८ तारखेला साजरी केले जाणार आहेत.
या उत्सवादरम्यान गर्दी आणि मिरवणुकीच्या व्यवस्थांचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवारी सरकारनं सुट्टी जाहीर केलीय. राज्यात शांततेचे वातावरण असावे.
या उत्सवादरम्यान गर्दी आणि मिरवणुकीच्या व्यवस्थांचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवारी सरकारनं सुट्टी जाहीर केलीय. राज्यात शांततेचे वातावरण असावे.
गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे, म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती भारतीय खिलाफत समितीच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. भारतीय खिलाफत समितीच्या शिष्टमंडळानं या संदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून ईद- ए- मिलादच्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस दुसऱ्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर २९ रोजी काढण्यात येणार आहे. ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी जुलूस ही एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या या निर्णयामुळे मुंबई पोलिसांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील कार्यालयात जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. सरकारने शुक्रवारी सरकारी सुट्टी जाहीर केलीय. यामुळे सलग ४ दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद असल्याने त्याची सुट्टी दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्ट्यांचे आहेत. तर सोमवारी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुट्टी असणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपतीची मनापासून भक्ती करतो. विसर्जन प्रक्रियेदरम्यान आपण शिस्त आणि शांततापूर्ण वातावरण राखावे.” गणेश विसर्जन आणि ईद शांततेत आणि सामंजस्याने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून श्रीगणेशाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी काळात ईद, त्यानंतर नवरात्री आणि दिवाळी असे सण आहेत. आपण सर्वांनी हे सण एकात्मतेने आणि भक्तिभावाने साजरे करावेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-ए-मिलाद हा एकजुटीचा आणि प्रेमाचा सण आहे. या सोहळ्याचा उपयोग परस्पर आदर, स्नेह आणि सौहार्द वाढवण्यासाठी करूया.” पैगंबर मुहम्मद यांचा त्याग आणि प्रेमाची प्रेरणा घेऊन परस्पर आदर आणि स्नेह वाढवे असे आवाहनही त्यांनी केले आहे.