Monday, July 28, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत गळतीमुळे पाणी उपसा बंद शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम!

इचलकरंजीत गळतीमुळे पाणी उपसा बंद शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम!

इचलकरंजी, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला दोन ठिकाणी गळती तसेच जुनी वितरण पाईप बदलण्याचे काम हाती घेतल्याने पाणी उपसा बंद करण्यात आला आहे.

त्याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार असून दोन-तीन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता तीन ते चार दिवसाआड होणार असल्याची शक्यता आहे. शहराला केवळ पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागणार आहे.

इचलकरंजी शहराला मजरेवाडीतून कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळपाणी योजनेच्या वितरण नलिकलेला इचलकरंजी शहरातील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) व महासत्ता चौकात गळती लागली आहे. सदर गळती काढण्यासाठी कृष्णेतून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात शिरढोण व टाकवडे येथे वितरण नलिकेच्या जुन्या बदलून नविन पाईप लाईन जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

शिरढोण व टाकवडे येथे वारंवार लागणाऱ्या गळतीचे वितरण नलिका बदलण्याचे काम हाती घेतले असून ही वितरण नलिका बदलण्यानंतर या वितरण नलिकेला गळती लागण्याचे नगण्य होणार आहे. मात्र सध्या गळती काढण्याचे व पाईप लाईन बदलण्याचे काम हाती घेतले असल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा  विस्कळीत होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठा शहरवासियांनी जपून वापरावा, असे आवाहन जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -