Dahi Kadhi Recipe : सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो जो १५ दिवस असतो. या दिवसांमध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात. पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते.पितृपक्षाच्या थाळीमध्ये काही खास पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांना विशेष महत्त्व असते. पितृपक्षात कढी सुद्धा बनवली जाते. जर तुम्हालाही पितृपक्षात स्वादिष्ट कढी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य :
दही
चणा डाळीचे पीठ
साखर
मोहरी
जिरे
मेथी
आलं लसूण पेस्ट
हिरव्या मिरच्या
कढीपत्ता
हिंग
कोथिंबीरकृती
सुरुवातीला पाणी टाकून दही चांगले घुसळून घ्या.
त्यानंतर चणा डाळीच्या पीठात पाणी घालून घट्ट मिश्रण बनवा
कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे मोहरी आणि मेथी टाका
त्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट टाका आणि चांगले परतून घ्या
त्यात हळद घाला आणि दही टाका
गॅस मंद आचेवर ठेवा आणि कढईत चणा डाळीचे पीठ टाका.
पीठ चांगले मिसळून घ्या आणि त्यानंतर प्रमाणानुसार त्यात पाणी टाका.
चवीनुसार मीठ आणि साखर टाका आणि त्यात कोथिंबीर टाका
मंद आचेवर कढी चांगली उकळून घ्यावी.
स्वादिष्ट कढी तयार होणार.