टाटा सियाराने एसयूव्ही सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे. लूक्स आणि फीचर्सने सर्वांनाच प्रभावीत केल्यानंतर आता सियाराने मायलेज आणि वेगाची झलक दाखवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सची (TMPV) नवीन आणि हाय-टेक SUV टाटा सिएराने लाँच होताच मोठा पराक्रम केला आहे. टाटा सिएराने जास्तीत जास्त मायलेजचा एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. फक्त 12 तासांच्या सलगच्या ड्राईव्हमध्ये सिएराने 29.9 किमी प्रति लिटरचे आश्चर्यकारक मायलेज देऊन सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टाटा सियाराची मायलेज टेस्ट ही इंदूरच्या NATRAX येथे घेण्यात आली. 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पिक्सेल मोशन टीमने ती पूर्ण केली. फक्त छोटे छोटे ब्रेक घेऊन ड्रायव्हर्स बदलण्यात आले. सलग 12 तासांच्या ड्राईव्हनंतर 29.9 किमी प्रति लिटर या आश्चर्यकारक मायलेजची नोंद करण्यात आली आणि त्याच दिवशी रेकॉर्ड देखील सर्टिफाइडल देखील करण्यात आले.
1.5 लिटर हायपरियन पेट्रोल इंजिनची शक्ती
या मायलेज रेकॉर्डमागील खरा हिरो टाटा सिएराचे 1.5 लिटर हायपरियन पेट्रोल इंजिन ठरले. टाटाचे नवीन हायपरियन इंजिन तंत्रज्ञान हे या रेकॉर्डचे सर्वात मोठे कारण आहे. हे इंजिन केवळ इंधन कार्यक्षमता प्रदान करत नाही तर सुरळीत ड्रायव्हिंग, पॉवर आणि रिफाइनमेंटचे परिपूर्ण संतुलन देखील देते. त्याच्या काही प्रमुख तांत्रिक फायद्यांमध्ये अॅडव्हास्ड कम्बशन सिस्टिम, टॉर्क-रिच परफॉर्मंन्स बँड, कमी फ्रिक्शन असलेले आर्किटेक्चर आणि दीर्घ कालावधीसाठी स्थिर आणि कार्यक्षम इंधन वितरण यांचा समावेश आहे. या फीचर्समुळे इंजिनला 12 तासांच्या सतत ड्राइव्ह दरम्यान थकवा न येता कमाल कार्यक्षमता राखता आली.
बाउंड्री-पुशिंग टेक्नोलॉजी
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे सीपीओ मोहन सावरकर यांनी सांगिले की “सिएराने प्रवासात इतक्या लवकर राष्ट्रीय विक्रम गाठल्याचा आम्हाला अभिमान आहे. हायपरियन इंजिन पेट्रोल पॉवरट्रेनच्या सीमा ओलांडण्यासाठी विकसित केले गेले होते आणि हा विक्रम त्या कठोर परिश्रमाचा पुरावा आहे. यामुळे सिएराचे मूल्य आणखी दृढ होते. कारण ग्राहकांना आता केवळ स्टाईल आणि फीचर्सच नाही तर सर्वोत्तम दर्जाचे मायलेज देखील मिळते.”
सिएराने गाठला 222 किमी/तास वेग
टाटा मोटर्सने त्यांच्या नवीन टाटा सिएरा टर्बो पेट्रोलसह आणखी एक विक्रम रचला आहे. यामुळे ही एसयूव्ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स येथे हाय-स्पीड चाचणी दरम्यान सिएराने 222 किमी/तास वेग गाठला. हा वेग इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान एसयूव्ही आहे. यासह सिएरा आता तिच्या सेगमेंटमधील सर्वात चपळ एसयूव्हींपैकी एक बनली आहे. ग्राहकांसाठी येणाऱ्या कार सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी 190 किमी/ताशी कमाल वेगापर्यंत मर्यादित असतील.



