Friday, November 22, 2024
HomeBlogरिलायन्स ज्वेल्सवर दरोडा प्रकरणी सूत्रधाराला बिहारमधून अटक

रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा प्रकरणी सूत्रधाराला बिहारमधून अटक

 

सांगलीत भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्सवर साडेसहा कोटींचा दरोडा टाकणार्‍या टोळीच्या सूत्रधाराला बिहारमधील बेउर कारागृहातून अटक करण्यात आली. कारागृहातून तो दरोड्याची सूत्रे इंटरनेटच्या माध्यमातून चालवत होता अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.

 

सांगली-मिरज मार्गावरील वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर अग्निशस्त्राचा धाक दाखवत दुकानातील सोन्या-चांदी व हिर्‍याचे दागिने लुटण्याचा प्रकार ४ जून २०२३ रोजी भरदिवसा घडला होता. या ठिकाणापासून अल्प अंतरावरच पोलीस अधीक्षक कार्यालय व विश्रामबाग पोलीस ठाणे आहे. कायम वर्दळीचा रस्ता असतानाही हा दरोडा टाकण्यात टोळी यशस्वी ठरली होती. या प्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने नऊ आरोपी निष्पन्न केले होते. मात्र, टोळीचा सूत्रधार सुबोधसिंग ईश्‍वरप्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर, ता. चंडी, बिहार) हा बिहारमधील बिउर कारागृहात राहून टोळीचे सूत्र संचालन करीत त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातून ताबा घेत त्याला अटक करण्यात आल्याचे अधीक्षक तेली यांनी सांगितले.संशयित आरोपी सुबोधसिंग हा सोन्याचे व्यवहार करणार्‍या वित्तीय संस्था, ज्वेलरी शॉप, सोने कर्ज देणार्‍या मुथुट फायनान्स, मणिपुरम गोल्ड यासारख्या वित्तीय संस्थावर देशभरात दरोडे टाकून लूट करणार्‍या टोळीचा प्रमुख असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात ३२ गुन्हे दाखल आहेत. तसेच खून, खूनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -