Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट, कोकणात पावसाला सुरुवात

राज्यात दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट, कोकणात पावसाला सुरुवात

अवकाळी पाऊस राज्यात पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाणार आहे. खरीप हंगामात कमी पावसामुळे चिंतेत असणारा शेतकरी रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे चिंतेत आला आहे. राज्यात दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात हिवाळ्यात पावसाचा यलो अलर्ट मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. मंगळवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर बुधवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पावसाने राज्यात सरासरी गाठली नव्हती. कमी पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठाही नाही. त्यामुळे यंदा रब्बीची लागवड कमी झाली आहे. आता अवकाळीचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे.

कोकणात पावसाला सुरुवात
रत्नागिरीसह कोकणातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी परिसरात मघ्यरात्री अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह अर्धातास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा ही खंडीत झाला होता. लांजा शहरात अजूनही वीज पुरवठा सुरळीत नाही. मंगळवारी देखील दिवसभरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

आंबा बागेयतदार चिंतेत
अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. गुहागरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस नवीन मोहरलेल्या आंबा कलमांसाठी धोकादायक आहे. यामुळे अंब्याचे नुकसान होणार आहे. पावसामुळे मोहर खराब झाल्यास यंदा हापूस भाव खाणार आहे.

नंदुरबारमध्ये मिरचीचे नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने हवामानात बदल होत असल्याने याच्या सर्वाधिक फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे बाजार समितीकडून मिरचीचे खरेदी-विक्रीच्या व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काही शेतकरी आता मिरची साठवणूक करून ठेवत आहे. ढगाळ वातावरणामुळे सुकत नसल्याने, नवीन मिरची खरेदी करून सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे आता जागा शिल्लक राहिली नाही. नंदुरबार जिल्हा यावर्षी विक्रम अशी आवक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत दीड लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -