मोबाईल Reels मुळे संसाराची राख, रील्स बनवण्यापासून रोखल्याने पत्नीने काढला पतीचा काटा
मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. उठता-बसता, अगदी जेवतानाही, झोपायला जातानाही लोकांच्या हातात मोबाईल असतो. काहीजण तर सतत सोशल मीडियावर पडीक असतात. . मात्र त्यामुळे खासगी आयुष्यावर परिणाम होतोय, अतिक्रमण होतंय.
मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. उठता-बसता, अगदी जेवतानाही, झोपायला जातानाही लोकांच्या हातात मोबाईल असतो. काहीजण तर सतत सोशल मीडियावर पडीक असतात. व्हिडीओज आणि रील्सचाही भडिमार सुरू असतो. मात्र त्यामुळे खासगी आयुष्यावर परिणाम होतोय, अतिक्रमण होतंय हे कोणाच्याही लक्षात येत नाही. मग त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. मोबाईल आणि रील्सच्या अति मोहामुळे एक हसती-खेळता संसार उद्ध्वस्त झाल्याचे दुर्दैवी प्रकरण बिहारमध्य उघडकीस आलं . तेथील बेगुसराय येथून एक हैराण करणारी बातमी समोर आली. तेथे एका पतीने पत्नीला (मोबाईलवर) रील्स बनवण्यापासून रोखले. पण ते काही त्याच्या पत्नीला आवडलं नाही आणि तिने रागाच्या भरात पतीलाच संपवलं.
ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये तर एकच दहशत माजली. रिपोर्ट्सनुसार, आपल्या पत्नीने इन्स्टाग्रामवर रील्स बनवू नये अशी पतीची इच्छा होती. तो तिला वारंवाल रील्स बनवण्यापासून रोखायचा. यामुळे नाराज झालेल्या पत्नीने तिच्या माहेरच्यांसह मिळून पतीची निर्घृण हत्या केली. ही घटना खोदाबंदपूर क्षेत्रातील फफौत गावातील आहे. महेश्वर कुमार राय असे मृत व्यक्तीचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहन गावचा रहिवासी होता.
रिपोर्ट्सनुसार, ७ वर्षांपूर्वी महेश्वर कुमार याचे लग्न फफौत गावातील राणी कुमारी हिच्याशी झालं. महेशकुमार हा कलकत्ता येथे मजुरीचे काम करायचा. नुकताच तो सुट्टीसाठी घरी आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी इन्स्टाग्रामवर बरेच रील्स बनवत होती. पण महेशकुमारला ते न आवडल्याने त्याने पत्नी राणीला रील्स बनवण्यापासून रोखले. पत्नीने रील्स बनवू ये असे त्याचे मत होते, पण त्याची बायको राणी काही त्याचं ऐकत नव्हती.तिचं व्हिडीओ बनवणं कायम सुरू होतं.
संतापाच्या भरात दाबला गळा, माहेरच्यांनीही दिली साथ
खरंतर रविवारी, ७ जानेवारीला महेशकुमार हा त्याच्या सासरी, फफौत येथे गेला. तेथे त्याची पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी मिळून महेशकुमारचा गळा दाबून त्याची हत्या केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी महेशकुमारच्या भावाने तयाला फोन केला असता, तो कोणीच उचलला नाही. संशय आल्याने त्याच्या भावाने, वडिलांना फफौत गावी पाठवलं. तेथे त्यांना महेशकुमार मृतावस्थेत दिसला आणि त्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली.
कुटुंबियांचा सुनेवर आरोप
त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून मतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रील्स बनवण्यापासून रोखले म्हणून महेशकुमारची पत्नी आणि सासरच्या लोकांनीच त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी लावला. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.