मागील गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं राजकारण मराठा आरक्षणावरून तापलं होतं. अशातच मराठा बांधवांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते याबाबतचा अध्यादेश जरांगे यांच्याकडे सोपवला जाणार आहे.
मात्र यामध्ये सगेसोयऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र ‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण आहेत हे जाणून घेऊयात…
‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण?
अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल.