📣 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, तरुण आणि करप्रणालीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी घोषणा केली.
📌 *अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे*
● येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार
● गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करणार आहे.
● शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
● मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे.
● नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे.
● 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल.
● नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होईल. दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल.
● 1361 मंडई eName शी जोडल्या जातील. येत्या ५ वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू.
● आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
● तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल.
● महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे
👩🏻💼 *अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळालं?*
● महिलांची उद्योजकता २४ टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
● पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे
● एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे
● सर्व्हायकल कँसरबाबत ९ ते १४ वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे
● गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे
● तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरविले
● महिलांसाठी विधानसभेमध्ये एक ततृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत
🚂 *रेल्वेला काय मिळालं?*
▪️येत्या काही वर्षांत 3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जातील.
▪️हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील.
▪️या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.
▪️यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल.
▪️40 हजार सामान्य रेल्वे बोगी वंदे भारत मध्ये रूपांतरित केल्या जातील.