Budget 2024 LIVE Updates: आयकर प्रणालीमध्ये कोणताही बदल नाही; किती उत्पन्नावर Tax नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर करणार असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल.
दरम्यान, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच सविस्कर अर्थसंकल्प सादर केला जाईल असं म्हणताना पुन्हा एकदा मोदी सरकार असेच संकेत दिल्याचं पाहायला मिळालं. तूर्तास यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करदात्यांचे आभार मानत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करास पात्र नसेल असं स्पष्ट केलं. थोडक्यात यंदा जुनीच करप्रणाली लागू राहणार असून, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
यंदाच्या अर्थसंकल्पामधून बायोफ्यूल अर्थात जैविक इंधनासाठीच्या योजनांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहन, रेल्वे समुद्र मार्ग जोडण्यासाठीचे प्रकल्प यावर सरकार भर देईल. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीही सरकार काम करेल. टीयर 2 आणि टीयर 3 शहरांना हवाई मार्गानं जोडण्यात येणार आहे. वंदे भारतसाठी 40 लाख डब्यांची निर्मिती करणार. मेट्रो, नमो गाड्यांचं जाळं उभारणार
2024- 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्नाचा आकडा 30.80 लाख कोटी रुपये आणि राहू शकतो.
देशातील गरीब आणि गरजवंतांच्या कुटुंबांना 18.50 रुपये प्रति किलो इतक्या दरानं 31 मार्चपर्यंत साखर उपलब्ध करून देणार.