- भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच आरआरबीने (RRB) एक नोटीस जारी केली आहे. भरतीसाठी तात्पुरती टाइमलाइन असलेली अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. लवकरच भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, किती जागांसाठी भरती असणार आहे हे आपण जाणून घेऊ.
अधिकृत सुचनेनुसार रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) या पदासाठी भरती सुरु होणार आहे. तसेच या पदासाठी एकूण ‘९०००’ रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज मागवले जाणार आहेत. या महिन्यात उमेदवारांसाठी अधिसूचना प्रकाशित केली जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार https://indianrailways.gov.in/ इथे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज सादर करणे मार्चमध्ये सुरू होईल आणि एप्रिल २०२४ मध्ये संपेल.त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची संगणक आधारित चाचणी (CBTs) परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहेत. तसेच कागदपत्रांची (डॉक्युमेंट) पडताळणी करून फेब्रुवारी २०२५ या उमेदवारांसाठी एक शॉर्ट लिस्ट जाहीर करण्यात येईल. भरतीसाठी पात्र, इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना जाहीर केल्यानंतर ती वाचून मगच ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कारण- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.