Sunday, December 22, 2024
Homeसांगलीज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवनू सुमारे एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झालेल्यामध्ये एका वकिल महिलेचाही समावेश आहे.मिरज शहर पोलीस ठाण्यात आरती होसपुरे यांनी कुलदीप काशीद व त्यांची पत्नी स्मिता काशीद या दोघांविरूद्ध ४३ लाख ८८ हजाराची फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली आहे. काशीद यांनी के. के. कन्सलटन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालॅसिस या नावाची कंपनी काढून गुंतवणूक दारांना मासिक ७ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. यामुळे गुंतवणूक दारांनी ५७ लाख ५० हजाराची गुंतवणूक केली. यापैकी परतावा म्हणून १३ लाख ६१ हजार रूपये परत मिळाले असले तरी उर्वरित रक्कम परत केली नाही म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -