Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगसावधान! Aadhaar कार्ड युजर्ससाठी अलर्ट; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर होईल पश्चाताप

सावधान! Aadhaar कार्ड युजर्ससाठी अलर्ट; ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर होईल पश्चाताप

आधार कार्ड आता सर्वत्र वापरलं जातं. ऑनलाईन आणि ऑफलाईन ओळखीसाठीही आधारचा वापर केला जातो. त्यामुळे आधारबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण आजकाल आधार कार्डचा गैरवापर होत आहे. आधारबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणूनहे लक्षात ठेवा

– आधार तपशील शेअर करताना काळजी घ्या. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर कोणाशीही शेअर करू नका. तसेच, बँक अकाऊंट नंबर किंवा पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तपशील शेअर करू नका.

– तुमचा आधार क्रमांक कोणाशीही शेअर करण्याऐवजी तुम्ही UIDAI व्हर्च्युअल आयडेंटिफायर (VID) जनरेट करा. तुम्ही सहज VID तयार करू शकता.

– गेल्या 6 महिन्यांची आधार व्हेरिफिकेशन हिस्ट्री UIDAI वेबसाईट किंवा mAadhaar एपवर तपासू शकता.

– OTP-आधारित आधार व्हेरिफिकेशनमुळे अनेक सेवांचा आनंद घेता येतो. तुमचा मोबाईल नंबर नेहमी आधारसोबत अपडेट ठेवा.

– UIDAI आधार बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधा देतं. हे सहजपणे लॉक आणि अनलॉक केलं जाऊ शकतं.

– आधारशी संबंधित तपशील टोल-फ्री हेल्पलाइन 1947 द्वारे आणि help@uidai.gov.in वर ईमेलद्वारे मिळू शकतात.

हे करू नका

– तुमचे आधार कार्ड/पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.

– ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आधार शेअर करू नका.

– तुमचा आधार OTP कोणाशीही शेअर करू नका.

– तुमचा आधार पिन कोणाशीही शेअर करू नका

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -