Thursday, September 19, 2024
Homeइचलकरंजीकल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ४६ वी शाखा पलूस येथे कार्यान्वित

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ४६ वी शाखा पलूस येथे कार्यान्वित

इचलकरंजी /taji batmi team
KAIJSB Palus Branch संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ४५ शाखांच्या माध्यमातून कार्यरत व सहकारी बँकींग क्षेत्रात प्रतिथयश बँक म्हणून नावारूपास आलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या ४६ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा कराड-तासगाव रोड पलूस याठिकाणी बँकेचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सदर प्रसंगाचे औचित्य साधून त्यांनी बँकेच्या यापुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पलूस आणि परिसरातील सर्व नागरिकांनी बँक देत असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.KALLAPPANNA AWADE ICHALKARANJI JANATA SAHAKARI BANK

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यामध्येही यशस्वीरित्या कार्यरत आहे. पलूस हे शहर सांगली जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ औद्योगिक क्षेत्र, स्टील कंपन्या, फौंड्री आणि प्रिसिजन मशिन शॉपसाठी नामांकीत असलेले विकसित शहर असून द्राक्षांच्या उत्पादनासाठी मोठया प्रमाणावर प्रसिध्द आहे. अशा या विकसनशील शहराच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व आसपासच्या भागातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी व येथील जनसामान्यांची सेवा करण्यासाठी बँकेची शाखा पलूस याठिकाणी सुरू करत असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी केले.KALLAPPANNA AWADE ICHALKARANJI JANATA SAHAKARI BANK

ही बँक स्थापनेपासूनच सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक हितरक्षणास कटिबध्द असून, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा, कर्जाच्या व ठेवींच्या नुतन कल्पनांसह ही बँक पलूस येथे सुरु करत असल्याचेही त्यांनी सांगितले, बँक देत असलेल्या अनेक सोई-सुविधांचा लाभ या व आसपासच्या नागरीकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या प्रसंगी केले.

शाखेच्या उद्घाटन प्रसंगी तहसिलदार सौ. कल्पना ढवळे, माजी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विश्वतेज देशमुख, सत्यविजय सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश उर्फ बाळासाहेब पोवार, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव कुदाळे, संग्राम उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री निलेश युसुगडे, उद्योजक सुदर्शन खोत, माजी नगरसेवक दिलीप जाधव, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम पाटील, संजय गांधी निराधार योजना पलूस शहर अध्यक्ष सर्जेराव नलवडे, परशुराम शिंदे, कुमार माळी, किरण लाड, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहूल आवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, बँकेचे सर्व संचालक, बँकेचे माजी चेअरमन भूपाल कागवाडे, दऱ्याप्पाण्णा कोरे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश शाळगांवकर, पी. टी. कुंभार, विजय कामत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील व दिपक पाटील, शाखा व्यवस्थापक सुनिल हरोले, इतर अधिकारी व कर्मचारी सेवकवृंद तसेच या भागातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.KALLAPPANNA AWADE ICHALKARANJI JANATA SAHAKARI BANK

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -