Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर(facebook live) यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली.

 

या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच संबंधित (facebook live)घटना घडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणातील आरोबी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.मात्र मॉरिसने एवढं टोकाचं पाऊन का उचललं. अभिषेक घोसाळकर यांची एवढी क्रूर हत्या मॉरिसने का केली असे प्रश्न यामुळे उपस्थित होतात. पोलीस तपासात काही गोष्टी हळूहळू उलगडत आहेत. आर्थिक वाद आणि राजकीय वैर यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मॉरिसने कट रचून ही हत्या केल्याचं समोर येत आहे.

 

मॉरिस नोरोन्हाविरोधात पोलीस ठाण्यात ३७६ (बलात्कार) आणि ५०९ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लिल शेरेबाजी करणे) असे दोन गुन्हे दाखल होते. बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती. काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती. त्यातूनच त्यांच्यातील वैर वाढल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र जेलमधून बाहेर येताच मॉरिसने दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव केला आणि अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अभिषेक यांच्या वाढदिवसाला मॉरिसने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने त्याने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं होत्. त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि ते संपत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

 

दोघांमध्ये राजकीय वैर देखील होतं अशी माहिती देखील समोर आली आहे. मॉरिस दहिसर वॉर्ड क्रमांक एकमधून मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छूक होता. मात्र अभिषेक यांचा यासाठी विरोध होता. दोघांमध्ये याबाबत बैठकही झाली होती. या बैठकांमध्ये अभिषेक यांनी मॉरिसला वॉर्ड क्रमांक ८ मधून निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. मात्र मॉरिसला ती मान्य नव्हती, अशी माहिती ‘मिड डे’ने दिली आहे. याशिवाय दोघांमध्ये आर्थिक व्यवहारांवरुन देखील वाद होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -