Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारचा 21 कारखान्यांना थकहमी कर्ज देण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडेंच्या कारखान्याला कर्ज...

महाराष्ट्र सरकारचा 21 कारखान्यांना थकहमी कर्ज देण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडेंच्या कारखान्याला कर्ज मिळणार?

सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांचा चेअरमन सोबत बैठक पार पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार आहे. एकूण 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. नुकतंच भाजपवासी झालेले औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई सहकारी साखरकारखान्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता आहे

मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला कर्ज मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आजचा बैठकीबाबत सहकार विभागाकडून कारखानदारांना दिलेल्या नोटीसीमध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नाही. कारखानदारांना सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे पाटील अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. उद्या पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

 

‘या’ कारखान्यांना कर्ज मिळण्याची शक्यता

1 – सुंदरराव सोळूखे सहकारी साखर कारखाना बीड .

2 – संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा.

3 – वृध्दश्र्वेशर सहकारी साखर कारखाना पाथर्डी अहमदनगर.

4- लोकनेते मारुतीराव घुळे सहकारी साखर कारखाना नेवासा. 5- किसन वीर सहकारी साखर कारखाना वाई .

6- क्रांतीविर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना वाळवा सांगली .

7- किसन वीर सहकारी साखर उद्योग खंडाळा सातारा .

8- अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर अकोले .

9- कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा .

10 – स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अक्कलकोट

11- मुळा सहकारी साखर कारखाना सोनई नेवासा.

12 – शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा .

13 – शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कोपरगाव

14- तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.

15 – रावसाहेब पवार घोडगांगा सहकारी साखर कारखाना शिरूर .

16- राजगड सहकारी साखर कारखाना भोर.

17- विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम – भाजपा बसवराज पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -