जॉर्जियामधून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रिच मॅककार्मिक यांनी म्हटलंय की , (pm) पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. पंतप्रधान मोदींची दखल जगभरातील अनेक देश घेतात. आंतरराष्ट्रीय स्थरावरील अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी चे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.अमेरिकेतील एका खासदाराने (pm) पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
जॉर्जियामधून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रिच मॅककार्मिक यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहे. मी भारतात गेलो होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर खासदारांसोबत होतो.तेथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. तिथे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अनुभवली. त्यामुळे मोदी पुन्हा भारतात पंतप्रधान बनतील, असा मला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव मी सकारात्मकपणे पाहतो आहे.
देशाची अर्थव्यवस्था, देशाचा विकास, नागरिकांचं हित याबाबत मोदींचा दृष्टीकोण सकारात्मक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था वार्षिक ४-८ टक्क्यांनी वाढत आहे, असं रिच मॅककार्मिक यांनी म्हटलं. मॅककार्मिक यांनी पुढे म्हटलं की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारताचा जीडीपी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीडीपींपैकी एक आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे आहे. चीन आणि अमेरिका या स्पर्धेत काय भूमिका घेतात, हे देखील महत्त्वपूर्ण आहे.