पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणुसकीला काळिमा (Bhor News) फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ॲग्रो टुरिझम फार्ममध्ये काम करणाऱ्या नराधमाने आपल्याच (Pune Crime) सहकारी महिलेच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
ही घटना नोव्हेंबर 2018 च्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी शाळेत असताना तिला अचानक चक्कर आली, त्यामुळे तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला भीषण प्रकार सांगितला.
पीडित मुलीची आई तेलवडी परिसरातील एका नामांकित ॲग्रो टुरिझम फार्ममध्ये स्वयंपाकाचे काम करते. तिथेच बजरंग रामचंद्र खोपडे नावाचा व्यक्तीही कामाला होता. एके दिवशी मुलगी आपल्या आईकडे जात असताना, आरोपीने तिला फसवून फार्ममधील एका खोलीत नेले. तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले आणि कोणालाही काही सांगितल्यास जिवंत न सोडण्याची धमकी दिली. या भीतीपोटी त्या चिमुरडीने हा छळ अनेक महिने कोणालाही सांगितला नाही.







