वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नशिब फुटकं निघालं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विजयासाठी मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. आता बंगळुरुच्या गोलंदाजांवर विजयाची भिस्त असणार आहे.वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निराशाजनक कामगिरी केली. नाणेफेकीचा कौल बंगळुरुच्या बाजूने लागल्याने विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. प्रथम फलंदाजी घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याचं कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं होतं. पण बंगळुरुची फलंदाजी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजासमोर ढासळली.
आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने बंगळुरुचा संघ बॅकफूटवर आला. एलिस पेरीने एकटीने झुंज देत सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. स्मृती मंधान, सोफी डिव्हाईन, दिशा कसाट, रिचा घोष, सोफी मोलिनक्स झटपट बाद झाले. एलिस पेरीला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. एलिस पेरीने 50 चेंडूत 66 धावांची खेळी केली.
यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. साइका इशाकच्या गोलंदाजीवर नॅट स्कायव्हरने तिचा झेल पकडला. पण तिथपर्यंत तिने संघाला सन्मानजनक धावा करून दिल्या होत्या.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सुरुवातीला माती खाल्ली असली तरी सन्मानजनक धावा करण्यात यश आलं आहे. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 135 धावा केल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं आहे. आता मुंबई हे आव्हान गाठून अंतिम फेरीत प्रवेश करते की बंगळुरु धावा रोखण्यात यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर, जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक