वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली. यात स्थानिक पक्षांना समावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सामील होऊ शकते अशी चर्चा होती.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची तशी चर्चा देखील सुरु होती. मात्र आता वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली आहे.
बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली त्यांनी चार जागेवरती लढावं त्यांना आम्ही सूचना केले आहेत हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता .
या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील.
तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.