मुंबई इंडियन्सने रेकॉर्ड 5 वेळा आयपीएलच जेतेपद पटकावलं. फ्रेंचायजीने मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्याच्याजागी हार्दिक पांड्याची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर रोहित आणि हार्दिकमध्ये संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या. फॅन्सना सुद्धा हा निर्णय पटला नव्हता.
आयपीएल 2024 चा सीजन सुरु होण्याआधी मागच्या तीन महिन्यांपासून एका निर्णयाची भरपूर चर्चा आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीने एक निर्णय़ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबरला आपला यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. हा निर्णय अनेकांना पटलेला नाही.
मुंबई इंडियन्स खासकरुन रोहित शर्माचे फॅन्स फ्रेंचायजीवर भडकलेले आहेत. रोहित आणि हार्दिकमध्ये आता पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत, अशा सुद्धा बातम्या आल्या. अफवांचा हा बाजार गरम असताना आता मुंबई इंडियन्सने दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामुळे फॅन्स अजूनच भडकलेत.
नव्या सीजनची तयारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने बुधवारी 20 मार्चला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. टीमच्या ट्रेनिंगचा हा व्हिडिओ होता. यात सर्व खेळाडू एकत्र हडलमध्ये उभे होते. नवीन कॅप्टन हार्दिक आणि रोहित सुद्धा त्याचा रिंगणात होता. हार्दिकने रोहितला पाहिल्यानंतर तो त्याला भेटायला गेला. रोहितने हात मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने थेट त्याची गळाभेट घेतली.
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर उलट घडलं
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स टीममध्ये पुनरागमन केलय. कॅप्टन बनवल्यानंतर तो रोहित शर्मासोबत पहिल्यांदा एकत्र दिसला. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला अशी अपेक्षा असेल की, व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर भडकलेले फॅन्स शांत होतील. पण त्याचा उल्टाच परिणाम पहायला मिळाला.
रोहित शर्माचे फॅन्स या व्हिडिओवर अजिबात खुश नाहीत. हा व्हिडिओ बनावटी असल्याच त्यांच म्हणणं आहे. या व्हिडिओवर मुंबई आणि रोहितच्या फॅन्सनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत.
कुठल्या प्रश्नावर उत्तर देणं हार्दिकने टाळलं?
अलीकडेच हार्दिक पांड्याने रोहित शर्माशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिलं होतं. सोमवारी 18 मार्चला हार्दिकने मुंबईचा कॅप्टन म्हणून पहिली पत्रकार परिषद घेतली. रोहित आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. कारण रोहित अजूनही टीम इंडियाचा कॅप्टन आहे असं त्याने सांगितलं.
कॅप्टनशिप करताना रोहित शर्माची पूर्ण साथ मिळेल असा विश्वास हार्दिक पांड्याने व्यक्त केला. मुंबई इंडियन्स टीममध्ये परतण्यासाठी कॅप्टनशिपची अट ठेवलेली का? या प्रश्नावर उत्तर देण हार्दिकने टाळलं.