राजस्थान रॉयल्सच IPL 2024 मध्ये शानदार प्रदर्शन कायम आहे. लखनऊ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवणाऱ्या RR ची टीम दिल्ली कॅपिटल्सवर सुद्धा भारी पडली. राजस्थान रॉयल्सने पहिली फलंदाजी केली. त्यांनी 185 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दिल्लीची टीम 20 ओव्हर्समध्ये 173 धावा करु शकली. दिल्ली टीमच्या पराभवाची अनेक कारण आहेत. पण या पराभवाला सर्वाधिक जबाबदार ऋषभ पंत आहे. दिल्लीला जेव्हा वेगाने धावा बनवण्याची आवश्यकता होती, तेव्हा ऋषभ पंतने फक्त 107 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यानंतर ऋषभने आऊट झाल्यावर जे काम केलं, त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये शिक्षा सुद्धा मिळू शकते.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
ऋषभ पंत 14 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. लेग स्पिनर युजवेंद्र चहलने त्याचा विकेट घेतला. पंतने चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. अशा पद्धतीने आऊट झाल्याने पंत खूप रागात होता. बाऊंड्री लाइनच्या बाहेर जाताच त्याने साइडच्या पडद्यावर जोरात बॅट मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाद झाल्यामुळे पंतची चिडचिड झाली होती, म्हणून त्याने असं केलं. दिल्लीच्या विजयासाठी पंतच क्रीझवर रहाण आवश्यक होतं. पण असं होऊ शकलं नाही. त्याची किंमत दिल्ली कॅपिटल्सला चुकवावी लागली. दिल्लीने हा सामना 12 धावांनी गमावला.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
ऋषभ पंतने काय अपेक्षा व्यक्त केली?
सामना गमावल्यामुळे मी खूप निराश आहे असं ऋषभ पंतने मॅचनंतर सांगितलं. आम्ही या पराभवापासून काही गोष्टी शिकू शकतो, असही तो म्हणाला. पंतने सांगितलं की, “गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. मार्श आणि वॉर्नने चांगली स्टार्ट दिली होती. पण मधल्या ओव्हर्समध्ये आम्ही विकेट गमावल्या. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करु अशी अपेक्षा पंतने व्यक्त केली”
Rishabh pant too much frustrated, when he wicket at 28 runs on 26 balls. #RRvsDC #rishabhpant pic.twitter.com/GGCiCd7i6s
— Hariom (@ImHariom93) March 28, 2024