आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नईचं कर्णधारपद आहे. तर श्रेयस अय्यर कोलकाताचं नेतृत्व सांभाळणार आहे. चेन्नईने ऋतुराजच्या नेतृत्वात दणक्यात सुरुवात केली. चेन्नईने पहिले 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
त्यामुळे चेन्नईसमोर पराभवाची हॅटट्रिक टाळत कोलकाताचा विजय रथ रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.कोलकाता नाईट रायडर्स 3 विजयासह 8 एप्रिलच्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 2 विजयासह चौथ्या स्थानी विराजमान आहे. या दोन्ही संघातील सामना कधी आणि कुठे होणार आहे? हे आपण जाणून घेऊयात.
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना केव्हा?
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना 8 एप्रिल रोजी होणार आहे.
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना कुठे?
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना हा एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे पार पडणार आहे.
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना किती वाजता सुरु होणार?
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात बघता येईल.
चेन्नई सुपर किंग्ज | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिचेल, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, मुकेश चौधरी, शार्दूल ठाकुर, शार्दुल ठाकूर. रशीद, मिचेल सँटनर, समीर रिझवी, डेव्हॉन कॉनवे, मुस्तफिझूर रहमान, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथीशा पाथिराना, निशांत सिंधू आणि अरावेली अवनीश.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, नितीश राणा, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि अल्लाह गझनफर.