Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रआनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

आनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

मागील वर्षे मान्सूनने देशातील अनेक भागांत तूट निर्माण केली. सरासरीपेक्षाही कमी पाऊस बरसला. परंतु यंदा मान्सून मनसोक्त बसरणार आहे. संपूर्ण देशांत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त असणार असल्याचे म्हटले आहे. मान्सून दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला आहे. ‘ला निना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे पाऊस चांगला होणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.

 

एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, 1951 ते 2023 पर्यंतचा माहिती तपासल्यानंतर देशात नऊ वेळा मान्सून सामान्य राहिल्याचे दिसून आले आहे. ला नीनाच्या प्रभावामुळेच असे झाले आहे. 1971 ते 2020 दरम्यानच्या आकडेवारीनुसार यंदा दीर्घ-काळ सामान्य पावसाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊस पडणार आहे.

 

देशात ८० टक्के भागांत सरासरीहून जास्त पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी सांगितले की, यंदा देशातील ८० टक्के भागांत सरासरीहून जास्त पाऊस पडणार आहे. देशातील ४ राज्यांत कमी पाऊस असणार आहे. अल नीनाच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होतो. आता त्याचा प्रभाव ओसरला आहे. अल नीना ऐवजी आता ला नीनाचा प्रभाव प्रशांत महासागरात निर्माण झाला आहे.

मागील वर्षी अल नीनामुळे 820 मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. देशात 868.6 मिमी पाऊस सरासरी इतका आहे. 2023 पूर्वी सलग चार वर्ष सामान्य पाऊस झाला होता. प्रशांत महासागराचे तापमान 30 वरून 18 अंश सेल्सिअस झाले आहे. यामुळे आता तिकडून इकडे वारे वाहत आहे. त्याचा फायदा भारतातील मान्सूनसाठी होणार आहे.

 

मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव

भारतात मान्सूनचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर आहे. देशातील जवळपास 50 टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच मान्सूनमुळे अनेक धरणांचा जलसाठा अवलंबून आहे. मागील वर्षी दमदार पाऊस न झाल्यामुळे त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -