Wednesday, May 15, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम

कोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम

 

कोल्हापूर लोकसभा निवडणूक हळूहळू रंगात(master plan) येऊ लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध जोडण्या केल्या जात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक नाराज कार्यकर्त्यांना एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आता मोठा मास्टर प्लॅन आखला असून तटबंदी भक्कम केली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना शहरातील 105 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.

 

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या 105 माजी नगरसेवकांची(master plan) महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी प्रचारात उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यामुळे महायुती अधिक बळकट झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ , खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्हजमधील या माजी नगरसेवकांची बैठक झाली.

 

खासदार महाडिक म्हणाले, “या 105 माजी नगरसेवक आणि बारा माजी महापौरांमुळे महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे. निवडणूक आली की, विरोधक भावनिक मुद्देबाहेर काढतात. आता देखील तेच सुरू आहे.”“घनकचरा, पंचगंगा प्रदूषण, आदी स्वरूपातील शहराचे जटील प्रश्न कायम आहेत. ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चर्चा झाली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मान्य केले आहे. त्याने कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे,” असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -