Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाMS धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार? रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य

MS धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार? रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य

 

सध्या आयपीएल 2024 मध्ये टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मापासून(t20 world cup) टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपर्यंत सर्वच जण अप्रतिम कामगिरी करत आहेत. हे दोन्ही खेळाडू आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

 

आयपीएलनंतर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप(t20 world cup)खेळायचा आहे. त्याबाबत लवकरच टीम इंडियाची घोषणाही केली जाऊ शकते. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

 

क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांच्याशी संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला की, एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक या हंगामात ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. धोनीने शेवटच्या सामन्यात फक्त 4 चेंडू खेळले आणि 22 धावा केल्या, त्याने जबरदस्त प्रभाव पाडला.

 

 

मात्र, धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी त्याला पटवणे कठीण आहे. तो अमेरिकेत येत असला तरी तो गोल्फ खेळायला येणार आहे. याशिवाय, दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी पटवणे सोपे जाईल, असे मला वाटते.

 

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे. आणि फिनिशरची भूमिका उत्तम बजावत आहे. दिनेशने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्याप्रकारे शानदार फलंदाजी केली, त्यावरून 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी होत आहे.

 

दिनेश कार्तिकच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या रोहितने सांगितले की, दिनेश कार्तिक हा टी-20 वर्ल्ड कपसाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. रोहित शर्माच्या या वक्तव्यावरून बीसीसीआयचे निवडकर्ते दिनेश कार्तिकच्या नावावर चर्चा करू शकतात असे दिसते. कारण दिनेशचा अलीकडचा फॉर्म खूपच उत्कृष्ट आहे आणि त्याला अनुभवही खूप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -