Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रगुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!

गुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!

एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) बाजारात काहीशी अस्थिरता आहे. मात्र आज 23 मे 2024 रोजी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. आज इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीने 22800 अंकाच्याही पुढे झेप घेतली. तर सेन्सेक्समध्येही 816 अंकांची तेजी पाहायला मिळत आहे.

सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टीही ऑल टाईम हाय

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांत खास काही घडलं नाही. मात्र गुरुवारचा दिवस शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. हा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास ठरला. या दिवसाच्या सुरुवातीपासून बाजारात तेजी पाहायला मिळाली. पुढे  शेअर बाजार तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देश चढाच राहिला. मुबंई शेअर बाजार अर्थात Sensex बुधवारी 74,221 अंकांवर बंद झाला होता. तर गुरुवारी हाच बाजार 74,253 वर चालू झाला. अचानकपणे या निर्देशांकात सकारात्मक बदल दिसायला लागले. सकाळी 11.30 वाजता बीएसई 444.23 अंकांनी उसळून थेट 74,665.29 वर पोहोचला आहे. दुपारी 1.12 वाजता बीएसई 816.85 अंकांच्या तेजीसह 75037.91अंकांवर पोहोचला.

निफ्टीने चरला इतिहास 

आज गुरुवारी बाजार चालू झाल्यानंतर निफ्टी 22614 अंकांवर होता. काही क्षणांत हा निर्देशांक 22800 अंकांवर पोहोचला. बुधवारी निफ्टी 22,597.80 अंकावर बंद झाला होता. याआधी निफ्टीने 22800 हा आकडा कधीही पार केलेला नव्हता. दुपारी 1.16 वाजता निफ्टीने 22836.85 अंकांपर्यंत झेप घेतली. बाजार बंद होईपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -