Monday, December 23, 2024
HomeBlogइचलकरंजी: कडीकोयंडा उचकटून दागिने व मोबाईल लंपास

इचलकरंजी: कडीकोयंडा उचकटून दागिने व मोबाईल लंपास

बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ५८ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व ६ हजाराचा मोबाईल असा ६४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. सदरची चोरीची घटना जिजामाता मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी रामुराम खेमाराम चौधरी (वय ४१) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गायत्री भवन परिसरातील जिजामाता मार्केट येथे रामुराम चौधरी हे राहण्यास आहेत. त्यांचा आचारी व्यवसाय असून २ जून ते ३ जून या कालावधीत घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून त्यामध्ये ठेवलेले साडेचौदा ग्रॅम वजनाचे ५८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ६४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -