Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीदादा केंद्रीय मंत्री होणार : केंद्रात कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदा स्थान मिळणार ?

दादा केंद्रीय मंत्री होणार : केंद्रात कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदा स्थान मिळणार ?

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांना केंद्रात मंत्री पद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खास. धैर्यशील माने यांना केंद्रात संधी मिळाल्यास त्याचा निश्चित फायदा मतदारसंघास होणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महायुतीचे धैर्यशील माने महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये धैर्यशील माने यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा खासदारकी मिळविली.

केंद्रातील भाजपप्रणित सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) राज्यात ७ खासदार निवडून आले आहेत. केंद्रातील एनडीए आघाडी सत्ता मिळविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये एनडीए आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. चार खासदारा मागे एक मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे.

त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे सात खासदार असल्यामुळे त्यांना एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्री पद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसऱ्यांदा विजयी झालेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे अभ्यासू आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे खास. माने यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -