महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी सांयकाळी आपला पदाचा कार्यभार स्विकारला.
महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती झाली होती. त्यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु वर्ष पूर्ण होण्या अगोदरच त्यांची बदली झाल्याने चर्चा रंगली आहे.
ओमप्रकाश दिवटे यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती केली. या संदर्भातील आदेश शासनाच्या ा नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी 7 राज्यपालांच्या आदेशाने पारीत केला आहे. दरम्यान, या बदलीच्या विरोधात दिवटे यांनी ‘मॅट’मध्ये जाण्याची तयारी केली असल्याचे समजते.



