येथील पाटील मळा भागात शनिवारी सायंकाळी अचानक विजेचा दाब वाढल्याने या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीमध्ये तीन टीव्ही फ्रिज आणि सुमारे 35 हून अधिक बल्ब जळून गेली आहेत. शनिवारी सायंकाळ सुमारास बालाजी नगर परिसरात असणाऱ्या उच्च दाब वाहिनीवर अचानक स्पार्क होऊन तेथील त्यानंतर भागातील घरात चालू असलेली विद्युत फुटले यामुळे घरभर काचा पडल्या.
इतकेच नाही तर यामध्ये काही जणांची फ्रिज टीव्ही इत्यादी उपकरणे देखील जळाली आहेत. विजेच्या या घटनेने परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे.