Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारकडून सामान्य माणसांसाठी मोठी भेट : धडाकेबाज निर्णय 1 जुलैपासून लागू

सरकारकडून सामान्य माणसांसाठी मोठी भेट : धडाकेबाज निर्णय 1 जुलैपासून लागू

मित्रांनो, भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अ‍ॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही ठिकाणी केला होता. आता मोदी कॅबिनट या 100 दिवसांच्या अ‍ॅक्सन प्लॅनला अंतिम रुप देत आहे. मोदी 3.0 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, यामुळे निर्णय घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहे. परंतु या 100 दिवसांत मोठा निर्णय होणार आहे.

मोदी सरकारच्या काळात निर्गुंतवणुकीत अजून आघाडी मिळाली नाही. आतापर्यंत सरकारला फारसे यश मिळालेले नाही. पण आता मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत आपल्या अजेंड्याअंतर्गत काही मोठी पावले उचणार आहे. या 100 दिवसांत काय होणार याविषयी आता अंदाज लावला जात आहे. त्याबद्दल माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयात दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला. शपथ घेतल्यानंतर अवघ्या 16 तासांनंतर, त्यांनी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली. याद्वारे शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

त्याचबरोबर देशाची जी आर्थिक गती आहे ती ज्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताचा जो जीडीपी आहे तो दरवर्षी सात टक्क्याने वाढत आहे. आणि आपल्या देशाला पाच मिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत लोकांना पाच लाख रुपयांची मेडिकल इन्शुरन्स दिला जायचा. परंतु याची मर्यादा हे दहा लाख रुपये पर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना त्यावरचे व्याजदर हे कमी करण्याचे देखील अंदाज आलेला आहे. दहा मोठी नगरे स्थापन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आणि या नगरामधून नोकरीच्या संधी भरपूर प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील वर्तनात आलेला आहे. बिल मध्ये देखील 0 रुपये कसे करता येईल हे देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वेहिकल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य ते वातावरण तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होईल. यांच्या चार्जिंग साठी सोलर उपलब्ध करून देण्याची सोय देखील करण्यात येणार आहे.

भारताने नव्याने सुरू करण्यात आलेला न्याय सुविधा कायदा अमलात आणणार आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाला लागणाऱ्या जीवना आवश्यक वस्तूच्या किमती ज्या वाढत आहेत. त्या कमी करण्याचा कडे लक्ष देतील सरकार देणार आहे. जेणेकरून भारताचे जे स्वप्न आहे विकसित भारत ते पूर्ण करता येईल.

अशाप्रकारे मोदी सरकारच्या तिसऱ्या सरकारांमध्ये हे काही बदल घडवून आणले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -