इचलकरंजी
इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँकेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी महिलांना 100 रूपयात बँक खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या महिलांचे बँक खाते नाही, अशा महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
चेअरमन सुनिल पाटील व व्हा. चेअरमन महादेव कांबळे यांचे नेतृत्वाखाली कार्यरत सन्मती सहकारी बँकेने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांना नवीन बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यातदेखील सरकारच्या विविध योजनांची रक्कम जमा करून लाभ घेता येईल. यापुर्वीही शासनाचे योजनांच्या सवलतीचा लाभ मिळण्यासाठी बँकेने खातेदारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बँकेच्या 11 शाखांमधून महिलांना मिळण्यासाठी तातडीने खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड व दोन आयडेंटी फोटो आवश्यक आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.