ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार असून तो या राशीत १५ ऑगस्टपर्यंर राहील. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने कर्क राशीत बुधादित्य आणि शुक्रादित्य योगदेखील निर्माण होतील. त्यामुळे काही राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारक असेल.
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
सूर्य करणार कर्क राशीत प्रवेश (Sun transit in cancer 2024)
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. विद्यार्थांसाठी उत्तम काळ, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भावंडांबरोबरच्या नात्यात आणखी प्रेम वाढेल.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. करिअरमध्ये हवी तशी प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. मानसिक तणाव दूर होईल.
मीन
सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने मीन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. या काळात तुम्हाला भौतिक सुखेदेखील प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. या काळात खर्चांवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.